Aditya-L1 Update : STEPS उपकरणाने केली डेटा गोळा करण्यास सुरवात, 'ISRO'कडून आलेख शेअर

सुर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' हे पाठवण्यात आलं आहे.
Aditya-L1 Update :  STEPS उपकरणाने केली डेटा गोळा करण्यास सुरवात, 'ISRO'कडून आलेख शेअर
Published on

'आदित्य एल-1' ही भारताची पहिली सौरमोहीम आहे. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11.50 सुमारास आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 'आदित्य एल-1' प्रक्षेपित करण्यात आलं होतं. सुर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' हे पाठवण्यात आलं आहे.

'आदित्य एल-1' ने वैज्ञानिक डेटा गोळा करणे सुरू केलं आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून 50,000 किमी पेक्षा जास्त अंतरावरुन सुप्रा-थर्मल आणि ऊर्जावान आयन व इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवती असलेल्या कणांच्या विश्लेषण करण्यासाठी मदत करतो.

'ISRO'ने एक आलेख शेयर केला असून त्यामध्ये त्यांनी ऊर्जावान कण वातावरणातील भिन्नता दर्शविल्या आहेत. एका युनिटद्वारे माहिती गोळा केली जाते. 'आदित्य L1 'हा डेटा संकलनाचा हा दुसरा टप्पा असणार आहे. लवकरात लवकर शास्त्रज्ञांना सूर्याची अनेक रहस्ये माहिती होतील. ही सगळी माहिती 'Aditya-L1'मध्ये स्थापित केलेल्या STEPS उपकरणाद्वारे मिळते.

या उपकरणात एकूण 6 सेन्सर्स बसवले आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या दिशांमधून सुप्रा थर्मल आणि ऊर्जावान आयनांची माहिती गोळा करतात. ज्यांची श्रेणी 20 keV/न्यूक्लिओन ते 5 MeV/न्यूक्लिओन इतकी असेल. हे उपकरण जो डेटा देईल. त्यामध्ये पृथ्वीभोवती असलेल्या कणांबद्दल, विशेषतः तिच्या चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती जाणून घेण्यास खास मदत करेल.

logo
marathi.freepressjournal.in