कृष्ण स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी

प्रादेशिक सागरी सुरक्षा वेगाने बदलत असलेल्या पार्श्वभूमीवर, ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी रविवारी भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
कृष्ण स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी
कृष्ण स्वामीनाथन नौदल प्रमुखपदीX
Published on

नवी दिल्ली : प्रादेशिक सागरी सुरक्षा वेगाने बदलत असलेल्या पार्श्वभूमीवर, ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी रविवारी भारताचे नवीन नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी रविवारी निवृत्त झाले. त्यांच्या जागी ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नेमणूक झाली. स्वामिनाथन यांनी नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून म्हणून यापूर्वी ते कार्यरत होते.

भारतीय नौदल देशाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे. आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या, अनपेक्षित आणि अनिश्चित अशा प्रादेशिक सुरक्षा वातावरणात नौदल अत्यंत सक्रियपणे तैनात आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘भारतीय नौदलाची मोहिमांची पूर्वतयारी आणि लढाऊ क्षमता सर्वोच्च पातळीवर राखणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता असेल, जेणेकरून देशाची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करता येईल. भारतीय नौदल आपली क्षमता वाढवण्याच्या आणि आधुनिकीकरणाच्या योग्य मार्गावर आहे.

नौदलाच्या विकासाचा हा वेग कायम राखणे, सर्व सुरू असलेल्या उपक्रमांना बळकट करणे, आवश्यक तिथे त्यात वाढ करणे आणि आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश करून आपल्या मोहिमांच्या क्षमता अधिक धारदार करणे हा माझा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in