"न्यायालयाच्या निर्णयावर लोकशाहीचे भविष्य..."; ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचे भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयामध्ये आज झालेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला
"न्यायालयाच्या निर्णयावर लोकशाहीचे भविष्य..."; ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचे भावनिक आवाहन

आज सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाच्या सुनावणीमध्ये सकाळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक बाबींचा उल्लेख केला. ते म्हणाले की, "देशाची लोकशाही सध्या धोक्यात असून संविधानिक मुल्यांना उचलुन धरणे, हा या न्यायालयाचा इतिहास आहे. आता जो निर्णय येईल तो देशातील लोकशाहीचे भविष्य ठरवणारा असेल," असे भावनिक आवाहन त्यांनी केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ५ याचिका दाखल झाल्या असून या याचिकांमध्ये उपसभापतींनी शिंदे गटातील १४ आमदारांच्या बरखास्तीची नोटीस बजावली होती. याबाबतसुद्धा न्यायालयामध्ये देखील सुनावणी सुरू आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, "न्यायालयाच्या इतिहासातला हा एक प्रसंग आहे. न्यायालयाने जर या प्रकरणात मध्यस्थी केली नाही, तर आपण आणि आपली लोकशाही धोक्यात येईल, याची मला खात्री आहे. कारण कुठलेही सरकार अशा प्रकारे टिकू दिले जाणार नाही." तसेच, राज्यपालांचे आदेश रद्द करण्यात यावे अशीदेखील मागणी त्यांनी यावेळी केली. त्याआधी त्यांनी 'मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी सरकार पाडले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, यासाठी राज्यपालांचा वापर करण्यात आल्याचेदेखील त्यांनी आरोप केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in