
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गणेशोत्सव व केरळातील ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन याच महिन्यात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
संरक्षण, टपाल, दूरसंचार खात्यासह विविध केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभमिळणार आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे वेतन दिले जाईल.