अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह दिल्लीतील अनेक प्रमुख मतदारांची नावे त्यांच्या तपशीलांमध्ये आढळलेल्या ‘विसंगतीं’मुळे नोटीस बजावलेल्या ३३ लाख मतदारांच्या यादीत आहेत.
अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई
अडवाणी, सिसोदियांना नोटीस; मतदारयादी तपासणीमध्ये पूर्वीच्या यादीशी मेळ न जुळल्याने कारवाई
Published on

नवी दिल्ली : माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह दिल्लीतील अनेक प्रमुख मतदारांची नावे त्यांच्या तपशीलांमध्ये आढळलेल्या ‘विसंगतीं’मुळे नोटीस बजावलेल्या ३३ लाख मतदारांच्या यादीत आहेत. मतदार यादी पुनर्विलोकन प्रक्रियेत ही नोटीस बजावली आहे.

अडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा आणि सून गीतिका यांना २००२ मधील विशेष पुनर्विलोकन यादीशी त्यांची नावे जोडता न आल्याने नोटीस बजावली आहे. मात्र, त्यांचा मुलगा जयंत यांचे नाव पडताळले गेले आहे. अडवाणी कुटुंबातील चौघेही नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहेत.

अडवाणी आणि सिसोदिया यांची नावे नोटीस बजावण्यात आलेल्या ३३.१३ लाख मतदारांच्या यादीत असल्याची पुष्टी करत अधिकाऱ्याने सांगितले की, ‘योग्य प्रक्रियेनुसार संबंधित मतदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची आणि तथ्यांची पडताळणी झाल्यानंतर त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. तथ्ये आणि कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून त्यानुसार नोंदींची वैधता तपासली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एसआयआर अंतर्गत केंद्र व दिल्ली सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, नोकरशहा आणि राजकारण्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनाही याच स्वरूपाच्या कारणांमुळे नोटिसा बजावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने सांगितले की, ज्या मतदारांची नावे मागील एसआयआरच्या मतदार यादीशी जोडता आली नाहीत किंवा मागील यादीशी जोडताना त्यांच्या तपशीलांमध्ये विसंगती आढळली, अशा मतदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

३० जून ते १७ ऑगस्टदरम्यान घराघरांत जाऊन करण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेत प्रत्येक मतदाराला गणना अर्ज सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते.

मसुदा मतदार यादीत सुमारे ९७ लाख मतदारांची नावे आहेत. त्यापैकी ३३.१३ लाख मतदारांच्या गणना अर्जांमध्ये विसंगती आढळल्याने त्यांना नोटिसांसाठी निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ३१.६३ लाखांहून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सीबीआय संचालक, जयशंकरनाही फटका

नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांच्या पत्नी क्योको एस. जयशंकर, सीबीआयचे संचालक प्रवीण सूद आणि त्यांचे कुटुंबीय, माजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि त्यांच्या पत्नी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्या. रंजना देसाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’ बाबत नोटीस बजावली आहे. त्यांच्या नोंदींमध्ये काही विसंगती आढळून आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in