तृतीयपंथीयांच्या रक्तदान बंदीबाबत म्हणणे मांडा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना

तृतीयपंथी, समलिंगी आणि वारांगना यांना रक्तदानाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून वगळण्यात आले आहे, त्याला आव्हान देणाऱ्या याचिका सादर करण्यात आल्या असून त्याबाबत म्हणणे स्पष्ट करावे, असे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.
तृतीयपंथीयांच्या रक्तदान बंदीबाबत म्हणणे मांडा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना
Published on

नवी दिल्ली : तृतीयपंथी, समलिंगी आणि वारांगना यांना रक्तदानाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून वगळण्यात आले आहे, त्याला आव्हान देणाऱ्या याचिका सादर करण्यात आल्या असून त्याबाबत म्हणणे स्पष्ट करावे, असे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने केंद्र सरकार, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना आणि राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेला नोटिसा पाठविल्या आहेत. रक्तदानाबाबतची ‘मार्गदर्शक तत्त्वे २०१७’बाबत सामाजिक कार्यकर्ते शरीफ डी. रांगणेकर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

तृतीयपंथी, समलिंगी आणि वारांगना यांना रक्तदाते होण्यापासून वगळण्याची २०१७ ची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ‘एचआयव्ही’सारख्या लागणीचा धोका असल्याने या प्रकारच्या लोकांच्या समूहाला रक्तदाते होण्यापासून कायमस्वरूपी वंचित रहावे लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in