Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या हजारामध्ये, आकडा वाढण्याची शक्यता

सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी
Afghanistan : अफगाणिस्तान भूकंपातील मृतांची संख्या हजारामध्ये, आकडा वाढण्याची शक्यता

अफगाणिस्तानमधील भूकंपातील (Afghanistan Earthquake) मृतांची संख्या १ हजारांवर पोहोचली आहे, तर १५०० लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या ग्रामीण आणि डोंगराळ भागात ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील खोस्ट शहरापासून ४० किमी अंतरावर होता.

अफगाण प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, देशात भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in