मणिपूर, नागालँड, अरुणाचलमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला

केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.
मणिपूर, नागालँड, अरुणाचलमध्ये  ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम, १९५८ च्या कलम तीननुसार ‘आफ्सा’ वाढवण्याचा निर्णय घेतला. मणिपूरच्या ५ जिल्ह्यांतील १३ पोलीस ठाण्यातील अधिकार क्षेत्र सोडून सर्व मणिपूरमध्ये १ एप्रिल २०२५ पासून पुढील सहा महिने अशांत घोषित करण्यात आले आहेत. अरुणाचलच्या तिरप, चांगलांग आणि लाँगडिंग आणि राज्यातील तीन पोलीस ठाणे क्षेत्रात ‘आफ्सा’ सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात ‘आफ्सा’ १९५८, १९७२ पासून लागू आहे.

logo
marathi.freepressjournal.in