शेवटी आपण सारे हिंदूच! डी. के. शिवकुमार श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष करणार

शिवकुमार केरळच्या राजधानीत रामचंद्रन फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आले होते.
शेवटी आपण सारे हिंदूच! डी. के. शिवकुमार श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष करणार

तिरुवनंतपुरम : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी २२ जानेवारी हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिन जल्लोषात साजरा करण्याच्या सरकारच्या घोषणेचे स्पष्टीकरण देताना शेवटी आपण सारे हिंदूच आहोत, अशी टिप्पणी केली आहे. ते केरळच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

शिवकुमार केरळच्या राजधानीत रामचंद्रन फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आले होते. तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की, काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने अयोद्धेच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय कसा काय घेतला, असा प्रश्न केला. कारण काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले की, शेवटी आपण सारे हिंदू आहोत. राम मंदिर काही कुणाची खासगी संपत्ती नाही. भाजपने निमंत्रण देताना निवडक लोकांनाच दिले आहे. देशात अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे.

आम्ही सर्व लोकांच्या भावनांचा आदर करतो. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर बांधण्यास पाठिंबा देऊन एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. आता प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या सज्ज झाली आहे, असेही शिवकुमार यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in