केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप नेते ७ एप्रिल रोजी जंतरमंतर येथे उपोषणाला बसणार आहेत, असे आपचे नेते गोपाळ राय यांनी बुधवारी सांगितले. आपचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी जंतरमंतर येथे उपोषण करणार आहेत.
केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला

नवी दिल्ली : मद्यधोरण घोटाळ्यातील मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली असून त्याला केजरीवाल यांनी एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.

याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्या. स्वर्णकान्त शर्मा यांनी निर्णय राखून ठेवत असल्याचे जाहीर केले. केजरीवाल यांनी अटकेची जी वेळ साधण्यात आली त्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे घटनेच्या मूळ रचनेच्या विरोधातील ही कृती निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला असल्याचा दावा केला. केजरीवाल यांच्या अर्जाला विरोध करताना ईडीचे वकील म्हणाले की, मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा प्रथमदर्शनी स्पष्ट झाला आहे, अर्जदाराविरुद्धचा तपास प्राथमिक स्थितीत आहे.

केजरीवाल यांच्या जिवाशी भाजप खेळतेय - अतिशी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक झाल्यापासून त्यांचे वजन झपाट्याने घटत आहे, असा दावा दिल्ली मंत्रिमंडळतील मंत्री अतिशी यांनी बुधवारी केला. केजरीवाल यांना कारागृहात डांबून भाजप त्यांच्या जिवाशी खेळत आहे, असा आरोपही त्यांनी केला. केजरीवाल यांच्या प्रकृतीसंदर्भात आप कायदेशीर मदतीची मागणी करणार आहे, असेही त्या म्हणाल्या. तथापि, केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीला सुरुवात झाल्यापासून त्यांच्या वजनात कोणताही चढउतार झालेला नाही, असे तिहार कारागृहाच्या प्रशासनाने म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ७ एप्रिलला उपोषण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप नेते ७ एप्रिल रोजी जंतरमंतर येथे उपोषणाला बसणार आहेत, असे आपचे नेते गोपाळ राय यांनी बुधवारी सांगितले. आपचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी जंतरमंतर येथे उपोषण करणार आहेत. या आंदोलनात शेतकरी, विद्यार्थी संघटना, व्यापारी संघटना सहभागी होऊ शकतात, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in