चेन्नईत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या किशोरवयीन मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आत्महत्या केल्याची मन हेलाऊन टाकणारी घटना घडली आहे. या व्यक्तीचा मुलगा गेल्या दोन वर्षापासून NEET परिक्षेत वारंवार नापास झाल्याने त्याने आत्महत्या केली होती. यानंतर या मुलाचे वडील. छायाचित्रकार सेल्वासेकर यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर त्यांनी रविवार रोजी त्यांच्या तामिळनाडू राज्यातील चेन्न्ई येथील क्रोमपेट भागातील त्यांच्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार जगदीश्वरन या १९ वर्षांच्या मुलाने २०२२ मध्ये १२ वी उत्तीर्ण केली होती. तेव्हापासून तो दोन वेळा एनईईटीला बसला. मात्र, दोन्ही वेळेला या मुलाला अपयशाला सामोरे जावं लागलं. यानंतर त्याने घरी एकटं असताना शनिवारी दुपारी आत्महत्या सारखे टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवलं. घरातील नोकराने शेजाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर जदगीश्वरनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. दोनवेळा परिक्षेत अपयश मिळवल्याने आपल्या मुलाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलं. यानंतर मुलाच्या जाण्याचे दु:ख सहन न झाल्याने सेल्वेकर यांनी देखील गळफास लावून आपलं जीवन संपवलं.
या घटनेवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शोक व्यक्त केला आहे. हे जाणून मला धक्का बसला आहे असं ते म्हणाले. NEETचा परिक्षार्थी जगदीश्वरन ने आत्महत्या केल्याने मला धक्का बसला आहे. त्याच्या आईवडिलांचं सांत्वन कसं करायचं याचा विचार करत असतानाचं दुसऱ्या दिवशी त्याचे वडील सेल्वसेकर यांनीही आत्महत्या केली. जगदीश्वरन याचं कुटूंब,नातेवाईक आणि मित्रपरिवार याचं सांत्वन कसं करावं हे मला कळत नसल्याचंही स्टॅलिन म्हणाले.