केजरीवाल अटकेप्रकरणी जर्मनीपाठोपाठ अमेरिकेचीही प्रतिक्रिया

दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांनी या अटकेला आव्हान दिले आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
केजरीवाल अटकेप्रकरणी जर्मनीपाठोपाठ अमेरिकेचीही प्रतिक्रिया

नवी दिल्ली : केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीने प्रतिक्रिया दिली होती. त्यापाठोपाठ आता अमेरिकेनेही वक्तव्य केले आहे. केजरीवाल यांच्या अटकेच्या कारवाईवर भारतातील विरोधी पक्ष लक्ष ठेवून आहेत, त्याचप्रमाणे आम्हीही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.

कायद्याचे निष्पक्षपणे पालन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. जर्मनीने दिलेल्या प्रतिक्रियेवर भारताने जर्मनीला खडे बोल सुनावले होते. आमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करू नका, असे जर्मनीला सुनावण्यात आले होते.

केजरीवालांच्या याचिकेवर आज सुनावणी

दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्यांनी या अटकेला आव्हान दिले आहे. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे.आपल्याला करण्यात आलेली अटक आणि ईडी कोठडी बेकायदेशीर असल्याने आपली त्वरित सुटका करण्यात यावी, अशी केजरीवाल यांनी याचिकेत मागणी केली असून त्यावर बुधवारी सकाळी न्या. स्वर्णकांत शर्मा यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी केजरीवाल यांनी त्यांच्यावर बजावण्यात आलेल्या समन्ससह सर्व प्रक्रिया रद्द करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in