घरवापसीनंतर नितीश कुमार प्रथमच पंतप्रधानांच्या भेटीला

बिहारमधील लालू प्रसाद यादवप्रणित आरजेडी पक्षासोबतची युती तोडून एनडीत घरवापसी करतानाच भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच जनता दल युनायटेड पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली.
घरवापसीनंतर नितीश कुमार प्रथमच 
पंतप्रधानांच्या भेटीला
Published on

नवी दिल्ली : बिहारमधील लालू प्रसाद यादवप्रणित आरजेडी पक्षासोबतची युती तोडून एनडीत घरवापसी करतानाच भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर प्रथमच जनता दल युनायटेड पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. तब्बल पाच दिवसानंतर ते पंतप्रधानांच्या भेटीला गेले.

१२ फेब्रुवारी रोजी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू-भाजप युतीचे सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणि राज्यसभा उमेदवारांच्या निवडणुक रणनीतीबाबत चर्चा या भेटीत होण्याची शक्यता आहे. २८ जानेवारी रोजी एनडीएत घरवापसी केल्यानंतर नितीश कुमार प्रथमच दिल्लीत आले आहेत. येथे पंतप्रधानांच्या भेटीनंतर ते भारतीय जनता पक्षाच्या अन्य बड्या नेत्यांची देखील भेटणार आहेत. दरम्यान नितीश कुमार यांच्या सरकारमधील बिहारचे भाजप कोट्यातील उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी सोमवारीच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. बिहारमध्ये सहा राज्यसभेच्या जागा रिकाम्या होत असून तासाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in