मोरबी दुर्घटनेनंतर कर्नाटकातील केबल ब्रिजचा व्हिडीओ व्हायरल ; झुलत्या पुलावर घातली मारुती कार

कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात ही घटना घडली. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ
मोरबी दुर्घटनेनंतर कर्नाटकातील केबल ब्रिजचा व्हिडीओ व्हायरल ; झुलत्या पुलावर घातली मारुती कार

गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेमुळे अवघा देश सुन्न झाला असताना कर्नाटकातील एका केबल ब्रिजवर मारुती कार घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात ही घटना घडली. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या व्हिडीओत काही पर्यटक मारुती-८०० कार केबल ब्रिजवरून नेताना दिसत आहेत, पण गुजरातमधील घटनेमुळे सजग झालेल्या नागरिकांनी त्यांना विरोध केला. यावेळी त्यांच्यात बाचाबाचीही झाली, पण त्यानंतर सदर पर्यटकाने आपली कार मागे घेतली. दोन व्यक्ती कारला समोरच्या बाजूने मागे ढकलत असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. गुजरातमधील दुर्घटनेला अवघे २ दिवस झाले असताना हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे लोकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शिवपुरा झुलता पूल प्रसिद्ध पर्यटन स्थळ

उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथील ‘शिवपुरा हँगिंग ब्रिज’ एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी शेजारच्या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील पर्यटकही पर्यटनासाठी जातात. स्थानिकांनी पुलावर कार घालणारे पर्यटक महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांनीही दखल घेतली असून, ते याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in