'चांद्रयान-३'च्या यशानंतर इस्रोचं मिशन 'गगनयान' ; अवकाशात पाठवणार अंतराळवीर

इस्रो गगनयान मोहिमेचं ट्रायल मिशन लाँच करणार असून यात आधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल.
'चांद्रयान-३'च्या यशानंतर इस्रोचं मिशन 'गगनयान' ; अवकाशात पाठवणार अंतराळवीर

चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून पुढील अंतराळ मोहीमेची सुरुवात झाली आहे. इस्रोने आता 'गगनयान'मोहीमेची तयारी सुरु केली आहे. ही मोहीम इस्रोची पहीली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमेद्वारे अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरु आहे. याअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. परंतु याआधी इस्रोकडून या मोहिमेची चाचणी होईल. इस्रो गगनयान मोहिमेचं ट्रायल मिशन लाँच करणार असून यात आधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल.

भारताच्या मानवी अंतराळ मोहिमेला 'गगनयान' असं नाव देण्यात आलं असून फायनल मिशनआधी ट्रायल मिशन होणार आहे. गगनयानाच्या प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी तीन चाचण्या घेण्यात येतील. या तिन्ही चाचण्या या मानवविरहीत असतील. यातील पहिल्या ट्रायल मिशनचं लाँचिंग के ते दीड महिन्यात होण्याची शक्यता आहे.यात मानवविरहीत यान रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात पाठवलं जाईल. यात रिकवरी सिस्टीम आणि टिमची पडताळणी करण्यात येईल.

या मोहिमेसाठी इस्त्रोकडून रोबोट तयार केला जात आहे. मानवाला अंतराळात पाठवण्याआधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल आणि त्यावर चाचणी केली जाईल. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये 'व्याममित्र'रोबोट अंतराळात पाठवला जाईल. हा 'हाफ-ह्युमनॉइड' रोबोट अवकाशातून इस्रोला सर्व अहवाल पाठवणार आहे. तसंच अंतराळतील मानवाच्या सुरक्षेबाबत सर्व तपशील इस्रोला देणार आहे. या रोबोटला जगातील 'बेस्ट स्पेस अक्सप्लोरर ह्यूमेनॉयड रोबोट' म्हणून किताब मिळाला आहे. सध्या हा रोबोट बंगळुरुत असून तो मानवाप्रमाणेच काम करतो.

तिसऱ्या लाँचिंगमध्ये भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं जाईल. 'गगनयान ही भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेत भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या चारही बाजूने ७ दिवसांपर्यंत भ्रमण करवां लागेल. सध्याच्या स्थितीनुसार गगनयान हे केवळ एक किंवा तीन दिवसांच्या पृथ्वी भ्रमंतीसाठी लाँच केलं जाईल.

'गगनयान' मोहिमेअंतर्गत भारतीय हवाई दलातील वैमानिकांना अंतराळवीर म्हणून अंतराळात पाठवलं जाणार आहे. यात भारतीय नौसेना आणि कोस्टगार्ड यांचाही समावेश आहे. यासाटी त्यांचं प्रशिक्षणही सुरु आहे. गगनयानाच्या फायनल लाँचिंग आधी अनेक चाचण्या केल्या जातील. यानंतर पुढील वर्षी गगनयानचं फायनल लाँचिंग होईल. हे मिशन भारताचं आतापर्यंतचं सर्वात महागडं मिशन असणार आहे. याचा एकूण खर्च दहा हजार कोटी रुपये येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in