राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याची सुटका होणार ; : सुप्रीम कोर्ट

राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याची सुटका होणार ; : सुप्रीम कोर्ट

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या एजी पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुटकेची मागणी करणाऱ्या पेरारिवलन याच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली होती व निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता. बुधवारी यावर निकाल देताना पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे तब्बल ३१ वर्षानंतर पेरारिवलन तुरुंगाबाहेर येणार आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणी १९ वर्षांचा असताना पेरारिवलन याला ११ जून १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती. ‘लिट्टे’ या संघटनेच्या शिवरासन याला ९ व्होल्टची बॅटरी दिल्याचा आरोप पेरारिवलनवर होता. राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रत्यक्ष अंमलात आणण्यात शिवरासन याची प्रमुख भूमिका होती. २१ मे रोजी राजीव गांधी यांच्या हत्येसाठी मानवी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरी या पेरारिवलनने पुरवल्या होत्या. १९९८ ला टाडा कोर्टाने पेरारिवलला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. तर २०१४ मध्ये या शिक्षेत बदल करत सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.

याप्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर हा सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. २००८ मध्ये पेरारिवलन याची सुटका करावी असा ठरावच तामिळनाडूच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. हा ठराव राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता. तेव्हापासून राष्ट्रपतींकडे हे प्रकरण प्रलंबित होते. राज्यपालांकडून निर्णय न आल्याने राष्ट्रपतींकडे पेरारिवलनने धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद १४२ च्या आधारावर पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in