आंदोलक कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा; सर्व पदकं गंगेत फेकण्याचा इशारा

कुस्तीपटूंनी आपल्याला मिळालेले सर्व मेडल हरिद्वार येथे गंगेत फेकण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलक कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा;  सर्व पदकं गंगेत फेकण्याचा इशारा

कुस्तीपटू मागील महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शांततेत आंदोलन करत आहेत. 28 मे रोजी नव्या संसद भवनाच्या उद्घानटाच्या दिवशी नव्या संसदेला घेराव घालून महापंचायतीचे आयोजन करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला होता. यासाठी त्यांनी आंदोनलस्थलावरुन नव्या संसदेच्या दिशेने कूच केली. यावेळी शांततेच्या मार्गाने नव्या संसदेकडे जात असलेल्या कुस्तीपटूंना मध्येच अडवून दिल्ली पोलिसांनी त्यांची धरपकड केली. त्यांचे आंदोलन मोडून काढत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन कुस्तीपटूंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. कुस्तीपटूंनी आपल्याला मिळालेले सर्व मेडल हरिद्वार येथे गंगेत फेकण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी बृजभूषण यांचा राजीनामा घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी कुस्तीपटूंकडून केली जात आहे. त्याविरोधात मागील महिन्याभरापासून कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शांततेच्या मार्गानं आंदोलन करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in