‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी; भारताची MIRV तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या क्लबमध्ये एंट्री

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे...
‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी; भारताची MIRV तंत्रज्ञान असलेल्या मोजक्या देशांच्या क्लबमध्ये एंट्री
(छायाचित्र - पीटीआय)

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सोमवारी ओदिशाच्या किनाऱ्यावरून अग्नी-५ या क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन 'मिशन दिव्यास्त्र' यशस्वी केले.

अग्नी-५चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर असून त्यात 'मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एण्ट्री व्हेईकल' (MIRV ) तंत्रज्ञान वापरले आहे. त्याच्या वापरामुळे एकाच क्षेपणास्त्रावर २ ते १० पारंपरिक किंवा अणुबॉम्ब बसवून ते शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची क्षमता भारताने मिळवली आहे. सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे.

logo
marathi.freepressjournal.in