पंतप्रधान मोदींच्या मोरबी दौऱ्यावर विरोधकांची टीका ; काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट
पंतप्रधान मोदींच्या मोरबी दौऱ्यावर विरोधकांची टीका ; काय आहे कारण?

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १३५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनेच्या तिसऱ्या दिवशीही नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांकडून शोधसत्र सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आज अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांची आणि जखमींची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ज्या रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले आहे, त्या रुग्णालयांमध्ये रंगरंगोटीची कामे केली असल्याचे काही व्हिडियो सोशल मीडियावर समोर आले. यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

आम आदमी पक्षाने यासंदर्भात व्हिडियो ट्विट करत पंतप्रधानांवर टीका करताना म्हंटले की, "मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे. कारण, पंतप्रधान मोदींच्या फोटोशूटमध्ये निकृष्ट दर्जाची इमारतीची पोलखोल होऊ नये. १४१ लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक बेपत्ता आहेत. दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. पण, भाजपचे कार्यकर्ते फोटोशूटच्या तयारीसाठी रंगरगोटी करण्यात व्यस्त आहेत."

तर दुसरीकडे काँग्रेसनेदेखील टीका करत म्हंटले की, " शोकांतकीचा इव्हेंट... पंतप्रधान मोदी मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलला भेट देणार आहेत. याआधी तिथे रंगरंगोटीचे काम सुरू केले. चकचकीत टाइल्स लावण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या फोटोंमध्ये कोणतीही कमतरता येऊ नये, यासाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. त्यांना लाज वाटत नाही! अनेकांना या अपघातात जीव गमवावा लागला आणि हे कार्यक्रम करण्यात गुंतले आहेत."

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in