एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार

विमान इंधनाच्या (जेट फ्युएल) वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने ९ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या इंधन अधिभारात (फ्युएल सरचार्ज) वाढ करण्याची घोषणा गुरुवारी केली.
एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार
एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : विमान इंधनाच्या (जेट फ्युएल) वाढलेल्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने ९ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या इंधन अधिभारात (फ्युएल सरचार्ज) वाढ करण्याची घोषणा गुरुवारी केली. अकासा एअरनेही देशांतर्गत उड्डाणांसाठी इंधन अधिभार (फ्युएल सरचार्ज) पुन्हा लागू केला असून, ९ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय सेवांसाठीच्या अधिभारातही वाढ केली आहे.

एअर इंडियाने म्हटले आहे की, भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील सततच्या दबावामुळे अ‍ॅव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतींमध्ये अलिकडच्या महिन्यांत मोठी अस्थिरता दिसून आली आहे.कंपनीने म्हटले आहे की, इंधन किमतींमधील ताज्या वाढीमुळे विमान कंपन्यांचा ऑपरेशनल खर्च आणखी वाढला आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चाचा एक मोठा हिस्सा इंधनावरच खर्च होतो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in