एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' अमेरिकेला पाठविणार

एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोइंग ७८७ या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. मात्र, या भीषण अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सला बरीच हानी पोहोचली असल्याने भारतात त्याच्यातील माहिती प्राप्त करणे कठीण होऊन बसले आहे. यासाठी आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठविला जाणार आहे.
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' अमेरिकेला पाठविणार
Published on

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोइंग ७८७ या विमानाचा १२ जून रोजी अपघात झाला होता. मात्र, या भीषण अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सला बरीच हानी पोहोचली असल्याने भारतात त्याच्यातील माहिती प्राप्त करणे कठीण होऊन बसले आहे. यासाठी आता हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत पाठविला जाणार आहे.

‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ आणि ‘कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर’ यांची एकत्रित माहिती असलेले उपकरण ब्लॅक बॉक्स असते. विमानाच्या मागच्या बाजूला जिथे अपघात झाल्यानंतर तुलनेने कमी धक्का बसण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी ब्लॅक बॉक्स ठेवला जातो.

प्रयोगशाळेत पाठविणार

एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर १००० अंश सेल्सियसपेक्षाही अधिकचे तापमान निर्माण झाले होते. त्यामुळे ब्लॅक बॉक्सचे बरेच नुकसान झाले. प्रचंड नुकसान झालेल्या ब्लॅक बॉक्समधून माहिती संपादित करण्याचे तंत्रज्ञान सध्या भारतात उपलब्ध नाही. त्यामुळेच वॉशिंग्टनस्थित असलेल्या ‘नॅशनल सेफ्टी ट्रान्सपोर्ट बोर्ड’ या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्स पाठविला जाणार आहे.

वॉशिंग्टनच्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण केल्यानंतर त्यातून मिळालेली माहिती भारतीय विमान अपघात तपास संस्थेकडे सोपविली जाईल. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ज्या देशात विमान अपघात घडला, त्याच देशाकडे अपघाताच्या तपासाचे नेतृत्व असते.

logo
marathi.freepressjournal.in