एअर इंडिया प्रकरण: माझ्या मुलाला ब्लॅकमेल केलं जातंय - श्याम मिश्रा

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार
एअर इंडिया प्रकरण: माझ्या मुलाला ब्लॅकमेल केलं जातंय - श्याम मिश्रा

एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मुंबईस्थित शंकर मिश्रा याला त्याच्या कंपनीने काढून टाकले आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून तो सध्या फरार आहे. दरम्यान, शंकर मिश्रा यांचे वडील श्याम मिश्रा यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिला आहे. माझ्या मुलाने त्याच्या वयाच्या स्त्रीशी यापूर्वी कधीही गैरवर्तन केले नाही. मग तो 72 वर्षीय महिलेसोबत असे कसे करू शकतो? माझ्या मुलाला ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांचे वडील श्याम मिश्रा यांनी केला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, माझ्या मुलाला फसवण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचा दावा श्याम मिश्रा यांनी केला आहे. “त्या महिलेने काही पैशांची मागणी केली. तिने मागितलेली रक्कमही नंतर देण्यात आली. पण पुढे काय झाले याची मला कल्पना नाही. तिने माझ्या मुलाकडून आणखी काही मागितले असावे, मागणी पूर्ण करू न शकल्याने ती महिला फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असावी, असा दावा श्याम मिश्रा यांनी केला.

काय आहे प्रकरण ?

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला पोलिसात तक्रार करू नये म्हणून लेखी माफी मागितली. पोलिसात तक्रार केल्यास त्याचा पत्नी आणि मुलांवर वाईट परिणाम होईल, अशी कैफियत आरोपीने मांडली. यानंतर पीडित महिलेने आरोपीला माफ केले आणि पोलिसात तक्रार देण्याचे टाळले. मात्र नुकतेच एअर इंडिया कंपनीने आरोपी शंकर मिश्राविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिश्रा यांना ३० दिवसांसाठी हवाई प्रवास करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in