Air India Case : एअर इंडिया प्रकरण ; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

एअर इंडियाच्या (Air India Case) विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याच्या प्रकरणावर आता डिसीजीएने मोठी कारवाई केली आहे
Air India Case : एअर इंडिया प्रकरण ; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियाचे (Air India Case) एका पुरुषाने महिलेवर लघुशंका केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता यासंदर्भात नवीन माहिती समोर आली असून, डिसीजीए नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला दंड ठोठावण्यात आले आहे. या प्रकरणात वाहतूक महासंचनलायाने ३० लाखांचा दंड ठोठावला असून विमानाच्या वैमिनिकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. विमानतल्या वैमानिकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. एवढाच नव्हे तर, या विमानाच्या डायरेक्टरला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

एअर इंडिया विमानामध्ये एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला पोलिसांनी अटक केली होती. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी त्याला ४ महिन्यांची बंदीही घातली आहे. २६ नोव्हेंबर २०२२ला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. यानंतर नागरी उड्डाण महासंचलनालयाने या प्रकरणी ताशेरे ओढले. 'सदरचा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे, असे प्रकार विमानात घडत असतील तर ते एअर इंडियाचे अपयश आहे,' असे डीसीजीएनने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in