परदेशी विमानसेवेत एअर इंडियाची कपात

एअर इंडियाने बुधवारी आपल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमध्ये कपात करण्याची घोषणा केली. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि इंधन दरात झालेली मोठी वाढ या पार्श्वभूमीवर दिल्ली-शिकागोसह ६ प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
परदेशी विमानसेवेत एअर इंडियाची कपात
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : एअर इंडियाने बुधवारी आपल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेमध्ये कपात करण्याची घोषणा केली. हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि इंधन दरात झालेली मोठी वाढ या पार्श्वभूमीवर दिल्ली-शिकागोसह ६ प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्गांवरील सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सध्या तोट्यात असलेल्या एअर इंडियाने यापूर्वीच काही मार्गावरील विमान फेऱ्या कमी केल्या होत्या. कंपनीने स्पष्ट केले आहे की, सेवांचे हे नवीन 'रॅशनलायझेशन' (सुसूत्रीकरण) जून ते ऑगस्ट या कालावधीत लागू राहील. विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, विशिष्ट क्षेत्रांमधील हवाई हद्दीवर असलेले निर्बंध. आंतरराष्ट्रीय विमान संचालनासाठी लागणाऱ्या इंधनाचे विक्रमी वाढलेले दर. या घटकांमुळे काही नियोजित विमान सेवा व्यावसायिकदृष्ट्या परवडणाऱ्या राहिलेल्या नाहीत.

स्थगित सहा मार्ग

दिल्ली – शिकागो, मुंबई - न्यूयॉर्क, दिल्ली - शांघाय, चेन्नई - सिंगापूर, मुंबई - ढाका, दिल्ली - माले (मालदीव) - हे ते सहा स्थगित मार्ग आहेत. काही मार्गांवर कपात केली असली तरी, एअर इंडिया दरमहा १,२०० हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू ठेवणार आहे. कमी मागणी असलेल्या आणि खर्च जास्त असलेल्या मार्गांवर तात्पुरती स्थगिती देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न एअर इंडिया करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in