एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होता होता वाचला; नेमकं काय घडलं?

केरळमधून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे तिरुवनंतपूरममध्ये केले एमर्जन्सी लँडिंग
एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होता होता वाचला; नेमकं काय घडलं?
Published on

केरळच्या कोझिकोड येथून एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले. हे विमान सौदी अरेबियाच्या दम्माम येथे जाण्यास निघाले होते. मात्र, उड्डाण घेतल्यावर अवघ्या दीड तासाने तिरुवनंतपूरम विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामध्ये तब्बल १८२ प्रवासी असून हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. यानंतर तिरुवनंतपूरमवरून प्रवाशांना दम्मामला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाल्याने या विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून सूचना मिळाल्यानंतर लगेचच विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर विमानाच्या मागच्या बाजूला तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. उड्डाण झाल्यानंतर अचानक काही वेळाने हा बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये मात्र चांगलीच घबराट पसरली होती. विमान खाली उतरेपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तब्बल दीड तास प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते.

logo
marathi.freepressjournal.in