एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १० लाख रुपये दंड

या नोटीशीला एअर इंडियाने दिलेल्या उत्तरात त्यांनी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याचे आढळून आले.
एअर इंडियाला डीजीसीएने ठोठावला १० लाख रुपये दंड

नवी दिल्ली : हवाई वाहतुकीच्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये नियमांचे पालन न केल्यावरून एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दिल्ली, कोची आणि बंगळुरू विमानतळावरील एअर इंडियाच्या संबंधात तपासणी केल्यानंतर, एअर इंडिया संबंधित नागरी उड्डाणासाठीच्या आवश्यक सुविधांच्या तरतुदींचे पालन करत नसल्याचे डीजीसीएला आढळून आले. त्यामुळे त्यांनी ३ नोव्हेंबरला एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. या नोटीशीला एअर इंडियाने दिलेल्या उत्तरात त्यांनी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याचे आढळून आले.

या सुविधांमध्ये विविध घटकांचा अंतर्भाव असून त्या एअर इंडियाने पूर्ण केलेल्या नाहीत. त्यात विलंबाने उड्डाणे न झाल्याने वा उशिरा झाल्याने प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था न करणे, त्यांच्या काही ग्राउंड कर्मचाऱ्‍यांना अटींनुसार प्रशिक्षण न देणे आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक श्रेणीतील प्रवाशांना भरपाई न देणे आणि त्यांना त्या सुविधा असलेल्या श्रेणीनुसार प्रवास करू न देताही भरपाई न देणे अशा बाबींचा समावेश आहे. या चुकांसाठी हा दंड ठोठावण्यात आल्याचे या संबंधातील पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in