एअर इंडियाची चूक : ९ तासांच्या उड्डाणानंतर फ्लाईट माघारी

एअर इंडियाचे एक विमान व्हँकुवरला जाण्यासाठी निघाले असताना एका विचित्र कारणामुळे एअर इंडियाला विमान माघारी बोलवावे लागल्याची घटना घडली आहे. मात्र यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
एअर इंडियाची चूक : ९ तासांच्या उड्डाणानंतर फ्लाईट माघारी
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: एअर इंडियाचे एक विमान व्हँकुवरला जाण्यासाठी निघाले असताना एका विचित्र कारणामुळे एअर इंडियाला विमान माघारी बोलवावे लागल्याची घटना घडली आहे. मात्र यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीतील विमानतळावरुन एअर इंडियाच्या बी७७७ एलआर विमानाने उड्डाण केले. हे विमान कॅनडातील व्हँकुवरच्या दिशेने निघाले. पण कॅनडात एअर इंडियाच्या बी७७७-२०० लाँग रेंज विमानांना परवानगीच नाही. कॅनडाने एअर इंडियाच्या बोईंग ७७७-३०० एक्सटेंडेड रेंजच्या ताफ्यातील विमानांना परवानगी दिली आहे. विमानाने ९ तास उड्डाण केल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यामुळे विमान पुन्हा माघारी आणण्यात आले.

चूक आली लक्षात

व्हँकुवरला जाण्यासाठी निघालेले विमान प्रवाशांनी भरले होते. पण या विमानाला कॅनडामध्ये परवानगीच नव्हती. विमान ९ तास उड्डाण करत चीनच्या कुनमिंग परिसरात पोहोचले होते. विमान चीनच्या हवाई क्षेत्रात असताना एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांना चूक लक्षात आली. यानंतर विमानाला पुन्हा दिल्लीला बोलावण्यात आले.

माघारी बोलाविले

फ्लाईट ट्रॅकिंग साईट्सच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी विमान दिल्लीत उतरले. त्यानंतर सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांनी या विमानाने दिल्लीहूनच उड्डाण केले होते. चूक लक्षात येण्याआधी विमानाने ९ तासांचे उड्डाण पूर्ण केले होते. चीनच्या हवाई क्षेत्रातून विमानाचा प्रवास सुरु होता. कॅनडात या विमानाला परवानगी नसल्याने ते पुढे नेण्याऐवजी माघारी बोलावण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in