एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द

पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे २४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे २४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.

यापूर्वी याच आठवड्यात इंडिगो आणि अकासा एअरनेही सौदी अरेबियातील विविध शहरांसाठीची उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली होती.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने जेद्दा, रियाध आणि दम्माम येथून येणारी व तेथे जाणारी उड्डाणे २४ ऑक्टोबर पर्यंत तात्पुरती स्थगित केली आहेत,' असे कंपनीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in