एअर इंडियाच्या 'त्या' वैमानिकावर होणार कडक कारवाई; फुकेत-दिल्ली विमानातील दुर्घटनेची गंभीर दखल

फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील दुर्घटना प्रकरणी 'विमान दुर्घटना तपास ब्युरो'ने संबंधित वैमानिकावर कडक कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
एअर इंडियाच्या 'त्या' वैमानिकावर होणार कडक कारवाई; फुकेत-दिल्ली विमानातील दुर्घटनेची गंभीर दखल
एअर इंडियाच्या 'त्या' वैमानिकावर होणार कडक कारवाई; फुकेत-दिल्ली विमानातील दुर्घटनेची गंभीर दखल
Published on

नवी दिल्ली : फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील दुर्घटना प्रकरणी 'विमान दुर्घटना तपास ब्युरो'ने संबंधित वैमानिकावर कडक कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

४ ऑगस्ट रोजी या विमानाचा मोठा अपघात टळला होता. या विमानातील तिन्ही हायड्रॉलिक सिस्टीम एकाच वेळी निकामी झाल्यामुळे ऑटोपायलट बंद पडला आणि विमान अचानक खाली-वर झाले. या तीव्र धक्कादायक घटनेत २४ जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर वैमानिकाची (पायलट-इन-कमांड) ड्रॅग चाचणी (डोप टेस्ट) केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.

एअर इंडियाचे 'एआय २३७९' हे ए३२०-२५१एन (व्हीटी-ईएक्सओ) विमान ४ ऑगस्ट रोजी सकाळी फुकेतवरून १४५ जणांसह (१३७ प्रवासी, ६ केबिन क्रू आणि २ पायलट) दिल्लीसाठी रवाना झाले होते. विमान ३६,००० फुटांवर असताना प्रथम 'ग्रीन' हायड्रॉलिक सिस्टीमचा दाब कमी झाला. अवघ्या ४ सेकंदात 'ब्लू' आणि 'यलो' या दोन्ही यंत्रणाही बंद पडल्या. विमानाचे संतुलन बिघडले. ऑटोपायलट डिस्कनेक्ट झाला आणि स्टॉल वॉर्निंगचा अलार्म वाजला. सह-वैमानिकाने (को-पायलट) लगेच सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मुख्य वैमानिकाने विमानाचे नियंत्रण मिळवले.

या काळात विमान अचानक ३७२ फूट वर गेले आणि त्यानंतर २९२ फूट खाली आले. सुमारे ९ सेकंदांनंतर 'ब्लू' सिस्टीम पूर्ववत झाली, त्यानंतर काही सेकंदात इतर दोन सिस्टीम चालू झाल्या आणि विमानाचे नियंत्रण सामान्य झाले. घटना घडली तेव्हा सीट-बेल्टचे संकेत बंद असल्याने प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना तीव्र धक्का बसला. विमानातील छताचे पॅनेल फुटले, सामानाची कपाटे (ओव्हरहेड बिन्स) उघडली, हँडरेल्स तुटले आणि टॉयलेटमधील कमोडही जागेवरून हलला.विमान सकाळी ११ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

वैद्यकीय पथकाने २४ जणांवर उपचार केले; ज्यामध्ये २० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. ४ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'सायकोॲक्टिव्ह' पदार्थांसाठी केलेल्या चाचणीत ३४ वर्षीय मुख्य वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. रक्ताच्या दुसऱ्या चाचणीतही याची पुष्टी झाली. सह-वैमानिकाची चाचणी निगेटिव्ह आली. एएआयबीने स्पष्ट केले की, वैमानिकाच्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे हायड्रॉलिक बिघाड झाला की नाही याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, या गंभीर बाबीची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने त्वरित कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

एअर इंडियाच्या 'त्या' वैमानिकावर होणार कडक कारवाई; फुकेत-दिल्ली विमानातील दुर्घटनेची गंभीर दखल
'हवेतच २-३ मिनिटं विमान हेलकावलं'; थायलंडहून येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइटमध्ये प्रवाशांचा थरकाप, Video

हा प्राथमिक अहवाल

घटनेच्या वेळी कोणतेही खराब हवामान नव्हते. त्यामुळे तांत्रिक बिघाडावर केंद्रित तपास सुरू आहे. फ्रान्सच्या 'बीईए' आणि 'एअरबस'च्या तज्ज्ञ पथकाने विमानावरील घटकांची पाहणी केली आहे. एअर इंडियाने तपासाला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले असून, या घटनेनंतर आपल्या १०० टक्के वैमानिकांची स्वेच्छेने ड्रॅग चाचणी सुरू केली आहे. एएआयबीचा हा प्राथमिक अहवाल असून संपूर्ण तपासणीनंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in