Air India Flight Turbulence : 'त्या' पायलटने घेतला होता गांजा

एअर इंडियाच्या फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या वैमानिकाने गांजा सेवन केल्याचे चाचणीत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.
Air India Flight Turbulence : 'त्या' पायलटने घेतला होता गांजा
Air India Flight Turbulence : 'त्या' पायलटने घेतला होता गांजा
Published on

मुंबई : एअर इंडियाच्या फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या वैमानिकाने गांजा सेवन केल्याचे चाचणीत आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मंगळवारी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचणीत वैमानिकाने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. ४ ऑगस्ट रोजी फुकेतहून येणाऱ्या विमानाला ओदिशाच्या हवाई हद्दीत उड्डाणादरम्यान अचानक मोठा धक्का बसला.

अवघ्या दोन सेकंदांत विमान सुमारे ३०० फुटांनी खाली आले. या घटनेत सुमारे २० प्रवासी आणि चार कर्मचारी जखमी झाले होते. याच्या चौकशीत हा निष्कर्ष समोर आला आहे. या घटनेमुळे नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नामुष्की झाल्यानंतर मंत्रालयाने देशातील सर्व विमान कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in