एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे नवे प्रमुख

जवळपास पाच हजार तासांहून अधिक कालावधीच्या उड्डाणाचा अनुभव असलेले लढाऊ वैमानिक अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
एअर मार्शल अमरप्रीत सिंग हवाई दलाचे नवे प्रमुख
PTI
Published on

नवी दिल्ली: जवळपास पाच हजार तासांहून अधिक कालावधीच्या उड्डाणाचा अनुभव असलेले लढाऊ वैमानिक अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ र मार्शल व्ही. आर. चौधरी ३० न सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार वे असून त्यानंतर सध्या हवाई दलाचे र उपप्रमुख असलेले अमरप्रीत सिंग पदभार स्वीकारणार आहेत.

परम विशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदकाचे मानकरी असलेले अमरप्रीत सिंग हे ३० सप्टेंबर रोजी दुपारपासून हवाई दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

अमरप्रीत सिंग यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला असून डिसेंबर १९८४ मध्ये त्यांची भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्यात नियुक्ती करण्यात आली. त्यांना जवळपास ४० वर्षाच्या सेवेचा अनुभव आहे.

अमरप्रीत सिंग हे नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असून एक पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक चाचणी वैमानिक आहेत. त्यांना विविध प्रकारच्या स्थिर आणि रोटरी-विंग विमानांवर पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले आहे.

चाचणी पायलट म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये मिग-२९ अपग्रेड प्रोजेक्ट मॅनेजमेंट पथकाचे नेतृत्व केले. ते राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालकही (उड्डाण चाचणी) होते आणि त्यांना 'तेजस' या हलक्या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीचे काम देण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in