दिल्लीत हवेचे प्रदूषण घातक स्तरावर ;एअर प्युरिफायर वापरण्याचे आवाहन

दिल्लीत हवेचे प्रदूषण घातक स्तरावर ;एअर प्युरिफायर वापरण्याचे आवाहन

वाहन प्रदूषणाला अंकुश लावण्यासाठी सरकारने ‘रेड लाइट ऑन गाडी ऑफ’ मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली : शेतातील पालापाचोळा जाळण्याच्या घटना व खराब हवामानामुळे दिल्ली-एनसीआर क्षेत्रात हवेचे प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे. यामुळे घरात एअर प्युरिफायर वापरण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वासाशीसंबंधी आजार वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील विविध भागात प्रदूषण ४०० एआयक्यूपेक्षा अधिक झाले आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सफदरजंग वेधशाळा भागात दृश्यमानता केवळ ५०० मीटर राहिली. शहराचे एकूण सरासरी हवेचे प्रदूषण ३६४ एआयक्यू झाले, तर द्वारका (४२०), रोहिणी (४२२), आनंद विहार (४५२), न्यू मोतीबाग (४०६), असे एआयक्यू नोंदले गेले.

आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांनी सांगितले की, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांमध्ये दमा व फुप्फुसाशी संबंधित समस्या वाढू शकतात. सफदरजंग रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख जुगल किशोर यांनी सांगितले की, दमा व श्वासाशी संबंधित रुग्णांनी आपली औषधे नियमित घ्यावीत. फार गरज वाटल्याशिवाय खुल्या हवेत जाऊ नये. तसेच घरात एअर प्युरिफायरचा वापर करावा.

वाहन प्रदूषणाला अंकुश लावण्यासाठी सरकारने ‘रेड लाइट ऑन गाडी ऑफ’ मोहीम राबवण्याचे ठरवले आहे. सार्वजनिक व्यवस्था मजबूत करायला व वाहन प्रदूषण कमी करायला १ हजार खासगी सीएनजी बस भाड्याने घेण्याची योजना सरकारने बनवली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या तज्ज्ञानुसार, दिल्लीत १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. कारण पंजाब व हरियाणात पराळी जाण्याचे काम वाढत असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in