विमानाने प्रवास करणारे ‘वंदे भारत’ ट्रेनला प्राधान्य देतील - मोदी

पंतप्रधानांनी गांधीनगर ते कालुपूरपर्यंत या नव्या ट्रेनमधूनही प्रवास केला. त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी, महिला उद्योजक आणि अनेक तरुणही ट्रेनमध्ये उपस्थित
विमानाने प्रवास करणारे ‘वंदे भारत’ ट्रेनला प्राधान्य देतील - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला शुक्रवारी हिरवा झेंडा दाखवला. “ही ट्रेन विमानाच्या तुलनेत १०० पट कमी आवाज करते. या ट्रेनचा अनुभव घेतल्यानंतर ज्यांना विमानाने प्रवास करायची सवय आहे ते लोक या ट्रेनला प्राध्यान्य देतील”, असे यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी गांधीनगर-मुंबई सेंट्रल ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला गांधीनगर स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. देशातील ही तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’ आहे. ही एक्स्प्रेस भारतातील पहिली स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन आहे. पंतप्रधानांनी गांधीनगर ते कालुपूरपर्यंत या नव्या ट्रेनमधूनही प्रवास केला. त्यांच्यासोबत रेल्वे कर्मचारी, महिला उद्योजक आणि अनेक तरुणही ट्रेनमध्ये उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in