भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत.
भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल

मेघा कुचिक/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावर भारतात पहिल्यांदाच एअरबसचे ए-३५०-९०० विमान दाखल झाले. हे विमान एअर इंडियाचे आहे. हे नवीन विमान अत्याधुनिक असून एअर इंडियाच्या नवीन लोगोसह सजलेले आहे. मंगळवारसोडून हे विमान रोज चालवण्यात येणार आहे. सध्या हे विमान देशातंर्गत मार्गावर चालवले जाणार आहे. या विमानाद्वारे प्रवाशांचा चांगल्या प्रवासाचा आनंद मिळणार आहे.

सोमवारी हे विमान बंगळुरूहून सकाळी ७.०५ वाजता सुटले ते मुंबईला ८.५० वाजता पोहचले. हे विमान बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, मुंबई मार्गावर चालवले जाईल.

एअर इंडियाचे ए-३५०-९०० विमानात तीन वर्ग आहेत. विमानात ३१६ जागा आहेत. त्यात २८ खासगी बिझनेस सूट, २४ प्रीमीयम इकॉनॉमी सीट व २६२ इकॉनॉमी सीटस‌् असतील. या विमानात आधुनिक पॅनॉसॉनिक ईएक्स३ ही मनोरंजन सेवा, उच्च क्षमतेच्या स्क्रीन्स असतील. या विमानाला रोल्स रॉईल्स ट्रेंट एक्सडब्लूबी इंजिन आहे. या विमानात २० टक्के इंधनाची बचत होईल. तसेच कार्बन उर्त्सजन कमी होईल. एअर इंडियाला ए-३५०-९०० या जातीचे पहिले विमान मिळाले आहे. कंपनीने आणखी १९ विमाने घेण्याचे ठरवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in