एअरबसचे भारतीय कंपनीला कंत्राट; A220 विमानाचे दरवाजे बनवणार : मेक इन इंडियाचा लाभ

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतरांच्या उपस्थितीत गुरुवारी येथे एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
एअरबसचे भारतीय कंपनीला कंत्राट; A220 विमानाचे दरवाजे बनवणार : मेक इन इंडियाचा लाभ
Published on

नवी दिल्ली : एअरबसने एका भारतीय कंपनीला A220 विमानाच्या सर्व दरवाजे तयार करण्याचे कंत्राट दिले असून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतरांच्या उपस्थितीत गुरुवारी येथे एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

हे कंत्राट बंगळुरू-आधारित डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीजला देण्यात आले आहे, जे आधीच एअरबस A330 आणि A320 विमानांचे फ्लॅप ट्रॅक बीम तयार करते. भारतीय एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसाठी हा सर्वात मोठा निर्यात करार आहे. एअरबसने भारतीय पुरवठादाराला दिलेला हा दुसरा दरवाजा-करार आहे.

एअरबसने २०२३ मध्ये, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडला A320 एअरक्राफ्टचे बल्क आणि कार्गो डोअर्स बनवण्याचे कंत्राट दिले. सिंधिया म्हणाले की, भारत विमानाचे घटक उत्पादन करण्यासाठी एक केंद्र बनत आहे. एअरबससाठी भारतात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे. विमान निर्मात्याने देशातून विमानाच्या घटकांची सोर्सिंग १.५ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी ते ७५० दशलक्ष डॉलर्स इतके होते.

logo
marathi.freepressjournal.in