
पाटणा : लालूप्रसाद यादव यांचे पूर्ण कुटुंब नाटक करत आहे. संपूर्ण कुटुंब एकमेकांना सांभाळून घेत आहे. त्यांनी माझे जीवन उद्ध्वस्त केले, असा आरोप तेजप्रताप यादव यांची घटस्फोटित पत्नी ऐश्वर्या राय हिने केला.
तेजप्रताप यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या प्रेमाची सोशल मीडियावरून कबुली दिल्यानंतर यादव कुटुंबीयांत वाद निर्माण झाला. लालूप्रसाद यादव यांनी तेजप्रताप यांना घर व पक्षातून बाहेर काढले.
जेव्हा तेजप्रताप यांचे दुसऱ्या मुलीशी प्रेम होते, तर माझ्याशी लग्न का केले? माझे जीवन उद्ध्वस्त का केले? असे प्रश्न तेजप्रताप यांची घटस्फोटित पत्नी ऐश्वर्या हिने केले.
ऐश्वर्या म्हणाल्या, 'हे सर्व लोक यात सामील आहेत.' ते काल रात्रीही भेटले असतील. हे सर्व निवडणुकांमुळे घडत आहे. आम्हाला सर्व माहिती माध्यमांकडून मिळते.