अकासा एअरलाइन्सची मुंबई-अहमदाबाद विमानसेवा सुरु,ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन

अकासा एअरने एक निवेदन जारी केले की, त्यांनी २८ साप्ताहिक फ्लाइटची तिकिटे विकण्यास सुरुवात केली आहे
अकासा एअरलाइन्सची मुंबई-अहमदाबाद विमानसेवा सुरु,ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन
Published on

अकासा एअरलाइन्सची पहिली व्यावसायिक विमानसेवा आजपासून सुरू झाली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी रविवारी आकासा एअरच्या मुंबई-अहमदाबाद फ्लाइटचे उद्घाटन केले. यापूर्वी शुक्रवारी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले होते की, ते आपल्या पहिल्या एअरलाइनसाठी बोईंग ७३७ मॅक्स विमान वापरणार आहेत.

अकासा एअरने एक निवेदन जारी केले की, त्यांनी २८ साप्ताहिक फ्लाइटची तिकिटे विकण्यास सुरुवात केली आहे. ही उड्डाणे ७ ऑगस्टपासून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, १३ ऑगस्टपासून बेंगळुरू आणि कोची मार्गांवर २८ साप्ताहिक उड्डाणे चालवली जातील. त्यांच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे. अकासा एअरने सांगितले आहे की ते दोन ७३७ मॅक्स विमानांसह त्यांचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करेल. बोईंगने त्यांना एक मॅक्स विमानाची डिलिव्हरी दिली आहे आणि दुसऱ्या विमानाची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी प्रवीण अय्यर म्हणाले, नेटवर्क विस्तार योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्ग काढू.

logo
marathi.freepressjournal.in