लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या अखनूर क्षेत्रातील एका गावाजवळच्या जंगलात दडून बसलेल्या आणखी दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी कंठस्नान घातले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या अखनूर क्षेत्रातील एका गावाजवळच्या जंगलात दडून बसलेल्या आणखी दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी कंठस्नान घातले. नियंत्रण रेषेजवळ जवळपास २७ तास ही चकमक सुरू होती. मंगळवारी सकाळी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याने या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या

तीन झाली आहे. नियंत्रण रेषेजवळून लष्कराचा ताफा जात आसताना ताफ्यातील रुग्णवाहिकेवर यापैकी एका दहशतवाद्याने सोमवारी सकाळी गोळीबार केला होता. त्या दहशतवाद्याला सोमवारी सायंकाळी सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. अन्य दोन दहशतवादी जवळच्या जंगलात दडून बसले होते.

दहशतवाद्यांची रात्री सीमेपलिकडून घुसखोरी

लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी भट्टल-खौर परिसरातील जोगवन गावात कारवाई करून अन्य दोघा दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादी रविवारी रात्री सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसले आणि त्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in