'नमाजात व्यत्यय आणू नये'; बदायूं मशिदीत नमाज पठणावर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाकडून रद्द

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने खासगी जागेत असलेल्या मशिदीच्या आतमध्ये नामाज अदा करण्यावर घातलेली बंदी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. खाजगी मालमत्तेवर असलेल्या मशिदीत नमाज अदा करण्यावर कोणतेही बंधन नाही आणि हा अधिकार मूलभूत आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
'नमाजात व्यत्यय आणू नये'; बदायूं मशिदीत नमाज पठणावर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाकडून रद्द
'नमाजात व्यत्यय आणू नये'; बदायूं मशिदीत नमाज पठणावर बंदी घालण्याचा आदेश न्यायालयाकडून रद्दप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने खासगी जागेत असलेल्या मशिदीच्या आतमध्ये नामाज अदा करण्यावर घातलेली बंदी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. खाजगी मालमत्तेवर असलेल्या मशिदीत नमाज अदा करण्यावर कोणतेही बंधन नाही आणि हा अधिकार मूलभूत आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

बंधन नाही

बदायूं येथील रहिवासी अलीशेर यांनी यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. शेखर बी. सराफ आणि न्या. विवेक सरन यांच्या खंडपीठासमोर झाली.

यावेळी खासगी जागेत धार्मिक प्रार्थना सभा आयोजित करण्यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही, असे खंडपीठाने सांगितले. तसेच, प्रार्थना करण्याचा अधिकार हा मुस्लिमांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत, न्यायालयाने प्रशासनाला याचिकाकर्त्यांच्या जागेच्या परिसरात केल्या जाणाऱ्या प्रार्थनांमध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in