ज्ञानवापी मशीद परिसराच्या एएसआय सर्व्हेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने या सर्वेक्षणाला स्थगिती देत २६ जुलै सांयकाळी ५ वाजेपर्यंत निकाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते
ज्ञानवापी मशीद परिसराच्या एएसआय सर्व्हेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीदीच्या परिसराने देशभराचे लक्ष वेधलं आहे. ज्ञानवापी मशीदीच्या एएसआय सर्व्हेवर अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आला आहे. हायकोर्टाच्या मुख्य न्यामूर्तींनी एएसाआय सर्व्हेक्षणाला मंजुरी दिली आहे. हायकोर्टानेच या सर्व्हेक्षणाला स्थगिती दिली होती.

वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापी मशीद परिसराच्या सर्व्हेक्षणाचे आदेश दिले होते. या निर्णयाला उच्च न्यायालयाने कायम ठेवले आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एएसआयने २४ जुलैपासून ज्ञानवापी मशीदीच्या सर्व्हेक्षणाला सुरुवात केली होती. यामुळे मशीद कमिटीकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने या सर्वेक्षणाला स्थगिती देत २६ जुलै सांयकाळी ५ वाजेपर्यंत निकाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने २७ जुलै पर्यंत निकाल राखून ठेवला होता. यानंतर उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट रोजी निकाल देण्याचं जाहीर केलं होतं. अखेर आज हा निर्यण देण्यात आला आहे. यामुळे आजपासूनच ज्ञानवापी परिसराचे एएसआय सर्व्हेक्षणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in