मला भारतात राहण्याची परवानगी द्या, पाकिस्तानी सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका
पाकिस्तानातून बेकायदेशीर रित्या भारतात आलेल्या सीमा हैदरने आता राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला आहे. मी सचिनसोबत लग्न केलं असून त्याच्यावर माझं खरं प्रेम आहे. त्यामुळे मी भारताची सून आहे. मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे मला भारताचं नागिरकत्व देण्यात यावं, अशी मागणी सीमा हैदरने आपल्या याचिकेत केली आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री आलिया भट यांच्यासारखे विदेशी नागरिक भारतात राहू शकतात मग मी का नाही, असा सवाल देखील केला आहे.
सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी एटीएसने नुकतीच चौकशी केली. यानंतर दोघेही आजाही पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता सीमा हैदर आणि शुक्रवारी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. यात तिने पती सचिन मीना आणि तिच्या चार मुलांसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.
सीमा हैदर आणि सचीन मीना यांचं पबजी खेळताना प्रेम जमलं होतं. सीमा ही 30 वर्षाची आहे तर सचिन हा 22 वर्षाचा आहे. सीमा ही तिच्या चार मुलांसह सचिनच्या प्रेमासाठी भारतात आली, असा दावा ती करत आहे. सध्या त्याचं प्रेमप्रकरण देशभर चर्चेत आहे.