भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

भारतातील आमच्या व्यवसायाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशाला हे प्राधान्यक्रम साध्य करण्यात मदत करण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांत ४८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करत आहोत.
भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
भारतात ४८ अब्ज डॉलर गुंतवणुकीची ॲमेझॉनची घोषणा; सीईओ अँडी जॅसी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट(Photo-X)
Published on

नवी दिल्ली : भारतातील आमच्या व्यवसायाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशाला हे प्राधान्यक्रम साध्य करण्यात मदत करण्यासाठी आम्ही आगामी पाच वर्षांत ४८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करत आहोत. आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या ‘विकसित’ व ‘आत्मनिर्भर’ भारताच्या संकल्पनेने प्रेरित आहोत आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात दीर्घकालीन भागीदार राहण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी घोषणा ॲमेझॉन कंपनीचे सीईओ अँडी जॅसी यांनी गुरुवारी केली. अँडी जॅसी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अँडी जॅसी यांनी सांगितले की, २०१०-२०३० या कालावधीत ॲमेझॉनची भारतातील एकूण संचित गुंतवणूक ८८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. ॲमेझॉन ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स व्यवसायाला बळ देणाऱ्या ऑपरेशन्स नेटवर्कमध्ये गुंतवणूक सुरू ठेवेल. कंपनीने या वर्षात २० हून अधिक नवीन फुलफिलमेंट सेंटर आणि १०० हून अधिक नवीन लास्ट माईल डिलिव्हरी स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे देशभरातील ग्राहकांना, टियर ३ आणि ४ शहरांमध्ये जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी मिळेल. याद्वारे ग्राहकांना अवघ्या काही मिनिटांत, तासांत आणि दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीसह सर्वात वेगवान सेवा आणि उत्पादनांची सर्वात मोठी श्रेणी उपलब्ध करून दिली जाईल.

ॲमेझॉनने आपल्या ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स नेटवर्कला चालना देणाऱ्या हजारो डिलिव्हरी असोसिएट्सच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या’सन्मान’ उपक्रमाचीही घोषणा केली आहे, असेही सांगण्यात आले.

ॲमेझॉन कंपनीची नवी गुंतवणूक भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करेल. ती भारताच्या विकास प्रवासात जगाचा वाढता रस दर्शवते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आम्ही एका दशकापूर्वी भारतात आलो आणि तेव्हापासून आमच्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्राहक, विक्रेते, डेव्हलपर्स, स्टार्टअप्स आणि उद्योगांना सेवा देत आहोत. आम्ही भारतात ॲमेझॉनचा विस्तार करत आहोत.

अँडी जॅसी, सीईओ, ॲमेझॉन

logo
marathi.freepressjournal.in