नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टपाठोपाठ आता ॲमेझॉननेही भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर म्हणजेच ३.१४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक एआय-आधारित डिजिटायझेशन, निर्यात वाढ आणि रोजगार निर्मितीवर केंद्रित असेल.
ही घोषणा ॲमेझॉनच्या वार्षिक एसएमबीएपएव्ही समिटमध्ये झाली, जिथे कंपनीने लहान व्यवसाय आणि एमएसएमईएसना एआय टूल्स देण्याची योजना सांगितली. २०१३ पासून आतापर्यंत ॲमेझॉनने भारतात एकूण ४० अब्ज डॉलर म्हणजेच ३.५९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यात कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
तीन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित
ॲमेझॉनची ही नवीन गुंतवणूक तीन मुख्य क्षेत्रांमध्ये म्हणजे एआयद्वारे डिजिटल परिवर्तनाला गती देणे, निर्यातीला प्रोत्साहन देणे जेणेकरून 'मेड-इन-इंडिया' उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचतील आणि रोजगार निर्मितीद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणे यावर लक्ष केंद्रित करणार आहे.