इराण, इस्रायलला जाण्याचे टाळा; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची भारतीय नागरिकांना सूचना

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलला जाण्याचे टाळावे, अशी सूचना...
इराण, इस्रायलला जाण्याचे टाळा; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची भारतीय नागरिकांना सूचना

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्रायलला जाण्याचे टाळावे, अशी सूचना भारताने शुक्रवारी भारतीय नागरिकांना केली आहे. वाढत्या प्रादेशिक तणावामुळे ही सूचना देण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

सध्या जे भारतीय इराण अथवा इस्रायलमध्ये वास्तव्याला आहेत त्यांनी भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहून तेथे आपल्या नावाची नोंद करावी, भारतीय नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि कामाशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in