
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी विक्रम नोंदवला. भारताच्या इतिहासात २२५८ दिवस गृहमंत्री राहण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
३० मे २०१९ मध्ये ते पहिल्यांदा गृहमंत्री बनले. ९ जून २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. १० जून २०२४ रोजी ते पुन्हा गृहमंत्री बनले. त्यानंतर ते आतापर्यंत गृहमंत्री आहेत.
गृह खात्यासोबतच ते देशाचे पहिले सहकार मंत्री आहेत. तत्पूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गुजरातचे गृहमंत्रीपदही त्यांनी सांभाळले आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेत त्यांनी जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपला.
अडवाणींचा विक्रम मोडला
गृहमंत्री म्हणून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विक्रम शहा यांनी तोडला आहे. अडवाणी हे २२५६ दिवस देशाचे गृहमंत्री होते. अडवाणी यांच्यापूर्वी काँग्रेस नेते गोविंद वल्लभ पंत हे सर्वात जास्त गृहमंत्री होते.