

भुज : सीमा सुरक्षा दलाकडे नवीन क्षेत्रे सोपवून त्यांच्याकडे कामाची अधिक जबाबदारी देण्याचा सरकार विचार करीत आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
सीमेलगतच्या प्रदेशाची प्रादेशिक सुरक्षाही त्यांच्याकडे देण्याचे संकेत त्यांनी दिले. केंद्र सरकारने बीएसएफची सीमा सुरक्षेची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.
सध्या बीएसएफ भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांचे रक्षण करते.
बीएसएफच्या ६० व्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून सीमा सुरक्षेची संकल्पना पूर्णपणे बदलली जाणार आहे.
यात सामान्य नागरिक, नागरी प्रशासन, स्थानिक पोलीस आणि लष्कर यांच्या सहकार्याने 'प्रादेशिक सुरक्षा' हा नवा दृष्टिकोन राबवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.