निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका

‘आंदोलने करून आणि धरणे धरणे धरून काहीही साध्य होत नाही. निवडणूक जिंकायची असेल तर जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील आणि कल्याणकारी योजनांवर काम करावे लागेल’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला.
निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीका
निदर्शने, आंदोलने कामाची नाहीत; राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शहा यांची टीकासंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : ‘आंदोलने करून आणि धरणे धरणे धरून काहीही साध्य होत नाही. निवडणूक जिंकायची असेल तर जनतेमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील आणि कल्याणकारी योजनांवर काम करावे लागेल’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, विरोधक राजकीय डावपेच आणि गर्दीच्या बळावर जनतेच्या जनादेशाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. काँग्रेस आपल्या नकारात्मक राजकारणामुळे पुढील ३० वर्षे तरी सत्तेवर येऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. शहा हे दिल्लीमध्ये यमुना पुनरुज्जीवनाशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्ली जल मंडळाच्या ८,९४१ कोटी रुपयांच्या ३३ प्रकल्पांचा शुभारंभ केला.

जनतेमध्ये जा,समस्या समजून घ्या...

‘ही निदर्शने, धरणे, आंदोलने करून काहीही साध्य होणार नाही. जर निवडणूक जिंकायची असेल तर जनतेमध्ये जा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या. जिथे तुमचे सरकार आहे, तिथे जनतेच्या कल्याणासाठी योजना लागू करा, नाहीतर इतर ठिकाणांहूनही तुमचा सफाया होईल’, असा सल्लाही त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in