काहींना तुरुंगातून सरकार चालविण्याचा पर्याय हवाय! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विरोधकांवर हल्ला

काही लोकांना तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय हवा आहे, म्हणूनच त्यांना इतका मनःस्ताप होत आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेमध्ये ‘१३० व्या घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके सादर केली आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : काही लोकांना तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय हवा आहे, म्हणूनच त्यांना इतका मनःस्ताप होत आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेमध्ये ‘१३० व्या घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके सादर केली आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्र्यांना पदावरून हटविण्याबाबतच्या या विधेयकाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. त्याअनुषंगाने शहा यांनी वरील विधान केले.

केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्र्यांना पदावरून हटवू शकणाऱ्या विधेयकाबाबत देशभर बरीच चर्चा चालू आहे. मोदी सरकारने बुधवारी (२० ऑगस्ट) लोकसभेमध्ये ‘१३० व्या घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके सादर केली आहेत.

ज्यामध्ये लाचखोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा केंद्रातील, राज्यातील एखाद्या मंत्र्याला सलग ३० दिवसांचा कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरून आपोआप हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे. या विधेयकाचे समर्थन करत अमित शहा म्हणाले, “काही लोकांना तुरुंगातून सरकार चालवण्याचा पर्याय हवा आहे, म्हणूनच त्यांना इतका मनःस्ताप होत आहे.

शहा म्हणाले, विरोधकांची इच्छा आहे की भविष्यात कधी तुरुंगात गेलो तरी तेथून सरकार चालवता आले पाहिजे, तुरुंगात राहून सहजपणे सरकार स्थापन करता आले पाहिजे, तुरुंगातच सीएम हाऊस (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान), पीएम हाऊस (पंतप्रधानांचे निवासस्थान) निर्माण करता आले पाहिजे आणि तिथून पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर सनदी अधिकाऱ्यांना आदेश देत राज्य व देश चालवता आला पाहिजे.

logo
marathi.freepressjournal.in