तृणमूलला 'टाटा, बाय-बाय' म्हणण्याचे हे वर्ष - गृहमंत्री अमित शहा

पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असून ही निवडणूक सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला ‘टाटा, बाय-बाय’ म्हणणारी असेल, पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’द्वारे घुसखोरांना बाहेर काढले जाईल आणि त्यामधूनही जे राहतील त्यांना भाजपचे मुख्यमंत्री बाहेरचा रस्ता दाखवतील, असे केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले.
तृणमूलला 'टाटा, बाय-बाय' म्हणण्याचे हे वर्ष - गृहमंत्री अमित शहा
तृणमूलला 'टाटा, बाय-बाय' म्हणण्याचे हे वर्ष - गृहमंत्री अमित शहा Photo : X (Amit Shah)
Published on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असून ही निवडणूक सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला ‘टाटा, बाय-बाय’ म्हणणारी असेल, पश्चिम बंगालमध्ये ‘एसआयआर’द्वारे घुसखोरांना बाहेर काढले जाईल आणि त्यामधूनही जे राहतील त्यांना भाजपचे मुख्यमंत्री बाहेरचा रस्ता दाखवतील, असे केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले. देशाच्या सुरक्षेसाठी राज्यात भाजप सरकार येणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या उत्तर परगाणा येथे सांगितले की, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार घुसखोरांना संरक्षण देत आहे. बंगालचे लोक तृणमूलला उखडून टाकतील, त्यांच्या निरोपाची वेळ आली आहे. ममतांना ‘एसआयआर’चा जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करू द्या, मतदार यादीतून घुसखोरांना काढावेच लागेल. जे घुसखोर उरले असतील, त्यांना भाजपचे मुख्यमंत्री येऊन बाहेर काढतील, २०२६ हे वर्ष तृणमूलला 'टाटा, बाय-बाय' म्हणण्याचे वर्ष आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

‘वंदे मातरम्’वरील चर्चेला तृणमूलचा विरोध

ज्या ‘वंदे मातरम्’चा उगम बंगालच्या भूमीतून बंकिमचंद्र यांनी केला. त्याच ‘वंदे मातरम्’वर जेव्हा संसदेत चर्चा सुरू होती, तेव्हा ममता बॅनर्जींचे खासदार त्या चर्चेला विरोध करत होते. आनंदपूरमध्ये लागलेली आग हा अपघात नाही,२५ लोकांचा जीव गेला आहे आणि २७ लोक बेपत्ता आहेत. ही घटना का घडली, या मोमो फॅक्टरीमध्ये कोणाचे पैसे गुंतवले आहेत, मोमो फॅक्टरीचे मालक कोण आहेत, असे सवाल त्यांनी केले.

आनंदपूर गोदामाला लागलेली आग ओरडून सांगत आहे की, यात ममता बॅनर्जींचे लोक सामील आहेत. ममता बॅनर्जींना हे लपवायचे असेल, पण एप्रिलनंतर जेव्हा भाजप सरकार येईल, तेव्हा आम्ही या आगीच्या दोषींना निवडून-निवडून तुरुंगात पाठवू, असेही गृहमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in