अमिताभ बच्चन यांना राम मंदिरामुळे लाभ

अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्यानंतर आता येथील मालमत्तेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमिताभ बच्चन यांना राम मंदिरामुळे लाभ

नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन यांना अयोध्येत राम मंदिर झाल्याचा वैयक्तिक लाभ झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी तेथे एक दहा हजार चौरस फुटाचा भूखंड खरेदी केला होता. त्या भूखंडाला तब्बल १४.५ कोटी रुपये भाव मिळाला आहे. मुंबईतील लोढा समूह अयोध्या विकास प्रकल्प राबवत आहे. त्यांनीच हा भूखंड खरेदी केला आहे. लोढा समूहाने व्यवहार झाल्याचे मान्य केले असले तरी त्याचा तपशील मात्र जाहीर केलेला नाही.

मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरयू प्रकल्पात समावेश असलेला बच्चन यांचा हा भूखंड साडेचौदा कोटींना विकला गेला आहे. अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेला भूखंड राम मंदिरापासून १० मिनिटे, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळपासून २० मिनिटे आणि सरयू नदीपासून २ मिनिटांच्या अंतरावर आहे. अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्यानंतर आता येथील मालमत्तेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन म्हणाले की, अयोध्या शहराला त्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे.

logo
marathi.freepressjournal.in